
प्रयाग चिखली वार्ताहर
करवीर तालुक्यातील क्षेत्र प्रयाग परिसरात विविध आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाच्या व महाप्रसादाच्या आयोजनाने ठिकठिकाणी दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आलीक्षेत्र प्रयाग येथील दत्त मंदिरामध्ये पहाटे दत्तात्रयांच्या पूर्णाकृती मूर्ती महा अभिषेक आरती पूजा करण्यात आली.

दुपारी बारा वाजता येथील दत्त मूर्ती पालखीतून टाळ मृदंगाच्या जयघोषात पंचगंगेच्या संगम घाटावर नेऊन दत्तमूर्तीला स्नान घालण्यात आले तसेच प्रयाग चिखली येथील विठ्ठल वारकरी मंडळाने वाजत गाजत भजन करत पालखी मिरवणूक काढली.

यावेळी मंदिरामध्ये दत्तात्रय जन्मोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला मंदिरातील पूजा कर्म येथील पुजारी यशवंत गिरी- गोसावी यांनी केले यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

दरम्यान आठवडाभरात गुरुचरित्र पारायण संपन्न झालेवरणगे येथील पंत दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम भजन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आलेसोनतळी येथील मनोहर घाडगे यांच्या दत्त मठी मध्ये गुरुचरित्र पारायण भजन प्रवचन कीर्तनाचे कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सप्ताह मध्ये आसुर्ले येथील परमपूज्य सद्गुरु आनंदसिद्ध महाराज ह भ प प्रणव रजपूत महाराज ह भ प राम चौगले यांची प्रवचने झाली याचबरोबर केर्ली, वडणगे शिंगणापूर हनमंतवाडी या ठिकाणीही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
