शरद पवारांना बेळगावात जायची गरज पडणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे की भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटकला घ्यावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यावर उत्तर देताना शरद पवारांना कर्नाटकात जायची वेळ येणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या घटनांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.महाराष्ट्र न्यायपूर्ण राज्य आहे. कुणाही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. कर्नाटक सरकारला माझं सांगणं आहे की सीमावादाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना चिथावणीखोर वक्तव्य करणे, तिथली परिस्थिती बिघडवणे योग्य नसून बेकायदेशीर आहे. तसेच हे दोन्ही राज्याच्या हितासाठी हे योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.