प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का ; संजय गायकवाड यांचा टोला

मुंबई : गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का? हे तपासावं लागेल, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला.

गुलाबरावही आक्रमक दरम्यान राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. पद गेलं खड्ड्यात, पण शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास ऐकून घेतला जाणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता.राज्यपालांविरोधातही गायकवाड आक्रमक याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरही संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले होते. या राज्यपालाला कुठंही नेऊन घाला, भगतसिंग कोश्यारी यांना राज्याच्या राज्यपाल पदावरून काढा. अशा प्रकारचा छत्रपतींचा अपमान होत राहिला तर आम्ही खपवून घेणार नाही, अन्यथा याचे परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होईल, असा इशारा संजय गायकवाड यांनी दिला होता. संजय गायकवाड यांच्या या भूमिकेचं राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं होतं.

🤙 8080365706