समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली ; आणि राहुल गांधीच्या प्रतिक्रियेने उपस्थितांची मने जिंकली..

मध्यप्रदेश : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे.समोरची गर्दी मोदी-मोदी नारे देऊ लागली, राहुल गांधींनी अशी दिली प्रतिक्रिया दिली की त्यांनी पुन्हा एकदा उपस्थितांची मने जिंकली.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमधील आगर येथे पोहोचली होती. यावेळी ही यात्रा पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी मोदी-मोदी चे नारे दिले. यानंतर राहुल गांधी यांनी त्या गर्दीकडे पाहिले. पहिल्यांदा या लोकांना हात दाखवला. यानंतर मोठ्याने नारे देण्यासाठी इशारा दिला. यानंतर राहुल गांधी यांनी त्या लोकांना फ्लाइंग किस दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

🤙 8080365706