
आरोग्य टिप्स : शरीरासाठी पाणी किती आवश्यक आहे हे तर आपण सगळे जाणतोच. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास आरोग्याचे अनेक फायदे होतात.

गरम पाण्याने पाचनशक्ती वाढते. जे खाणे पचण्यासाठी जड असते ते पचवण्यासाठी गरम पाण्याचा फायदा असतो. यामुळे पोट स्वच्छ राखण्यास मदत होते. तसेच पाचनसंबंधी कोणतीही समस्या सतावत नाही. पाचनशक्ती तंदुरुस्त असेल तर वेट लॉस करण्यातही मदत होते.
यासोबतच गरम पाण्यामुळे फॅट लॉसही होतो.पोटदुखीचा त्रास होत असेल अथवा पोटात मुरडा पडत असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो. दरम्यान गरम पाणी एकदम पिऊ नये थोडे थोडे प्यावे. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी असे पाणी प्यायल्यास हा त्रास होणार नाही. स्किन ग्लोसाठी दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. गरम पाण्याने पाचनशक्ती वाढते. जे खाणे पचण्यासाठी जड असते ते पचवण्यासाठी गरम पाण्याचा फायदा असतो. यामुळे पोट स्वच्छ राखण्यास मदत होते. तसेच पाचनसंबंधी कोणतीही समस्या सतावत नाही.
पाचनशक्ती तंदुरुस्त असेल तर वेट लॉस करण्यातही मदत होते. यासोबतच गरम पाण्यामुळे फॅट लॉसही होतो.पोटदुखीचा त्रास होत असेल अथवा पोटात मुरडा पडत असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो. दरम्यान गरम पाणी एकदम पिऊ नये थोडे थोडे प्यावे. तसेच दररोज सकाळी रिकाम्या पोटी असे पाणी प्यायल्यास हा त्रास होणार नाही. स्किन ग्लोसाठी दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे.
सकाळी गरम पाणी प्यायल्यास ब्लड फ्लो आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत मिळते. तसेच बीपीही नॉर्मल राहतो. नाक आणि घशाला त्रास होत असेल तर अशावेळेस कोमट पाणी प्यावे. याने नक्कीच फायदा होतो. यामुळे घसा स्वच्छ होण्यास मदत होते. रक्ताभिसरण वाढवण्यासाठी दररोज गरम पाण्याचे सेवन करावे.
गरम पाण्याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते. शरीरातील सर्व अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकली जातात. ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या असते अशा व्यक्तींनी एक ग्लास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबूचा रस टाकावा. हे पाणी प्यायल्याने भूक वाढते. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे असेल अशा व्यक्तींनी हे पाणी जरूर प्यावे.
