
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे अंतर्गत येणारे सात महाविद्यालय तसेच भारती विद्यापीठ चे न्यु लाॅ काॅलेज कोल्हापूर यांच्या वतीने डिसेंबर 2022 अखेर ऑफलाईन MCQ पध्दतीने परिक्षा घेण्यात यावे. अशी विनंती करणारे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के सर यांना देण्यात आले.

यावेळी उपस्थित बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष मंदार पाटील, गोविंद शिंदे, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे, सचिन बारड, अमृत गावडे, तौफिक नाईकवडी, हर्षद हजारी, मच्छिंद्र सावंत, मयुर जाधव, अरुण यादव, सौरभ कदम, तसेच इतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे.
