कागल तालुक्यातील प्राथमिक व उप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याची मागणी…

कागल : कागल तालुक्यातील प्राथमिक व उप प्राथमिक आरोग्य केंद्रासंबंधातील विविध प्रस्तावास तात्काळ मंजुरी द्या याबाबतचे निवेदन केंद्रीय आरोग्य मंत्री ना. भारती पवार यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी कोल्हापूर येथे दिले.

ना भारती पवार दोन दिवसाच्या सांगली,व कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत.निवेदनात पुढे म्हंटले आहे,कागल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सेनापती कापशी ची मुख्य इमारत व स्टाफ क्वार्टरस,कसबा सांगाव ता. कागल येथील आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे बांधकाम, तसेच चिमगाव व लिंगनूर (का), येथेनवीन उप प्राथमिक केंद्र याचबरोबर ग्रामीण रुग्णालय कागल व मुरगुड याचे विस्तारीकरण व कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक ,चिखली व उत्तुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम रूमची सुविधा असे सुमारे २१ कोटी ३८ लाखाचे विविध प्रस्ताव जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या शिफारीनुसार मंजुरीसाठी पाठवले आहेत.त्यास तात्काळ मंजुरी देऊन या कामास गती द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.राजे समरजीतसिंह घाटगे यांनी यापूर्वी कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (एस्टिमेट रक्कम रु ७ कोटी १३ लाख ) व गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (एस्टिमेट रक्कम रु २ कोटी ५२ लाख ) असे दोन प्रस्ताव आरोग्य मंत्रालय दिल्ली यांच्याकडे सादर केले होते, त्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली ही कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

🤙 8080365706