
गगनबावडा : दिगंबर म्हाळुंगेकर
गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत जुळवाजुळवीच्या राजकारणामुळे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने नामनिर्देशन दाखल करण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील तहसिल कार्यालयात तोबा गर्दी झाली.

तसेच नामनिर्देशन दाखल करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी दिसून आली. आज अखेर गगनबावडा तालुक्यात सरपंच पदासाठी ८१ तर सदस्य पदासाठी ३०० उमेदवार रिंगणात उतरले आहेत .
सविस्तर :
गगनबावडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून निवडणूक लागणार का मिटणार हा एकच प्रश्न प्रत्येक राजकीय अभ्यासकांच्या मनात घोंगावत होता. गगनबावडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मा.आमदार सतेज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मध्यस्थीने शक्यतो बिनविरोधीच्या मार्गावर . तालुक्यातील काही गावांमध्ये गटागटामध्ये राजकारणाची ठिणगी उडली असून अचूक उमेदवार निवडून सरपंच आमच्याच पार्टीचा यायला हवा यासाठी संघर्ष पाहायला मिळत आहे खरे चित्र माघारी नंतरच स्पष्ट होणार असले तरी बहुतेक ठिकाणी दुरंगीच पॅनेलची बांधणी झाली आहे त्यामुळे टोकाच्या इर्शेने या परिसराला राजकीय संवेदन शिलता आलेले आहे .
