राज ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर…..

कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ते आज दुपारी पुण्याहून कोल्हापूरला पोहोचतील. तब्बल ५ वर्षानंतर राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या स्वागताची कोल्हापूरकरांनी जोरदार तयारी केली आहे. आज राज ठाकरेंना पंढरपुरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापुरात विश्रामगृहावर भेटणार आहे.

कोल्हापुरात आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊसमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर तिथेच ते त्यांच्या जुन्या काही मित्रांनाही भेटणार आहेत. बुधवारी (३० नोव्हेंबर) राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील. कोकण दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत.

🤙 8080365706