स्वर्गात मिळेल मला अप्सरा…आफताब पूनावालाच धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान आफताबने “मी आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल मला अप्सरा…’ असं धक्कादायक विधान केलं आहे.

त्याच्या या वक्तव्याने पोलीस अधिकाऱ्याना देखील धक्का बसला आहे.तर इतकेच नव्हे तर त्याने २० पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते. तर, श्रद्धाला मारल्यानंतर त्याने एका मानसशास्त्रज्ञाला त्याच्या खोलीत आणले होते, तीही हिंदू होती. असं पोलिसांना दिलेल्या जबानीतून समोर आलं आहे. मात्र, या सगळ्या गोष्टीतून आफताबची क्रूर मानसिकता समोर आल्याचं दिसून येते.काय आहे नेमकं प्रकरण.!श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.

एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे ३५ तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.

🤙 8080365706