काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश दिला.

जळगाव : महाराष्ट्रातील जनतेने भारत जोडो यात्रेला अलोट प्रेम दिले. प्रचंड प्रतिसाद दिला. देशाला पुरोगामी विचारांचा वारसा देणाऱ्या या राज्यातील जनतेचे शतशः धन्यवाद, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गजानन महाराज, साई बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज असा देदीप्यमान विचारांचा वारसा घेऊन आम्ही देशभरात जाणार आहोत.

या संतांच्या विचाराने शेकडो वर्षे समता, सामाजिक न्याय तसेच बंधुत्वाची शिकवण दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाचा हाच संदेश आहे आणि भारत जोडो यात्राही हाच वारसा घेऊन नम्रपणे पुढे जात आहे. या प्रवासात महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला अपार प्रेम दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

🤙 8080365706