
कोल्हापूर: येथील प्रसिद्ध गूळ व्यापारी चिनूभाई हिंमतलाल परिख (वय ९० ) यांचे रविवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्ययात्रा सोमवारी १४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजता त्यांच्या हिमकमल, शिवाजी पार्क, गद्रे उद्यानाशेजारील निवासस्थानापासून निघणार आहे.
सूरज गॅस एजन्सीचे सुनितभाई परिख क्रिडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजीव परिख, तसेच उद्योजक जयकुमार परिख यांचे ते वडील होत. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योजक आनंद माने यांचे ते सासरे होते. त्यांच्या मागे मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. लायन्स क्लब, जैन श्वेतांबर समाज या माध्यमातून ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते.
