
पाकिस्तानने 138 धावांच्या छोट्या लक्ष्याचा बचाव करताना जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडला सहजासहजी विजय मिळू दिला नाही. पाकिस्तानच्या अजून 10-15 धावा जास्त असत्या तर कदाचित निकाल वेगळा दिसला असता. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
याच मेलबर्नच्या मैदानात 1992 साली पाकिस्तानने इंग्लंडला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. आज त्याच पराभवाची इंग्लंडने परतफेड केली. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. तो शेवटपर्यंत विकेटवर उभा राहिला. त्याने 49 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. इंग्लंडने पाच विकेटने वर्ल्ड कप जिंकला.
