
महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत.
महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली १०० टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.पण, या भरतीत नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर करण्यासंदर्भात काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नूकसान होणार आहे, यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या अटी शीथिल करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण ११ हजार ४४३ पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं ५० टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
