शेतकरी संघटनांची उद्या कराडात पायी दिंडी

कराड : सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली. यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते.

त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढण्याचे ठरले होते.दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. परंतु आत्ताचे साखर सम्राट हे साखर कारखान्याचे मालक असल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा तसेच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपला पहिला हप्ता ३०००च्या पुढे जाहीर करत आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सर्व शेतकरी यावेळी नमन करून त्यांचे नाव घेऊन राजकारण, समाजकारण करणाऱ्या तुमच्या कर्मभूमीतील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी, असं साकडं ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने घालण्यात येणार आहे.

🤙 8080365706