युथ बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.चेतन नरके यांची निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँकेच्या सन २०२२ ते २०२७ सालासाठी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदी थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉ.चेतन नरके तसेच उपाध्यक्षपदी उद्योजक सचिन शिरगावकर यांची एकमुखाने निवड करण्यात आली.

अध्यक्ष निवडीनंतर बोलताना डॉ.नरके म्हणाले, बहुजनांची बँक म्हणून प्रसिद्ध असणारी युथ डेव्हलपमेंट को-ऑप बँक लवकरच आपला सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे. गेल्या ४५ वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी आणि व्यवसायिक यांच्या प्रगतीमध्ये बँकेचे योगदान मोठे आहे. २०२५ सालापर्यंत सभासद तसेच ग्राहकांना बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यासोबत ५०० कोटीच्या ठेवींचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यासाठी संचालक मंडळात सर्व क्षेत्रातील लोकांचा समावेश  केला आहे. बँकिंग क्षेत्रातील दर्जेदार सुविधांसह कृषी, दुग्धव्यवसाय,महिला, बेरोजगार यांच्यासाठी विशेष योजना  आणि इतर पूरक सेवा देखील बँकेच्या वतीने देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी.के. पाटील यांनी कामकाज पहिले.  यावेळी जेष्ठ  संचालक अरुण नरके, माजी अध्यक्ष आर.पी. पाटील, विश्वास जाधव, कार्यकारी संचालक आर.बी. सूर्यवंशी यांच्यासह  इतर  संचालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706