ईडीच्या याचीकेवर उत्तर द्या ; संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश…

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने केलेली जामिनावरील सुटका रद्द करावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने संजय राऊत व प्रवीण राऊत यांना शुक्रवारी दिले.

ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले त्यावेळी त्यांच्याकडे न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध नव्हती. त्यामुळे ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी न्या. भारती डांगरे यांच्या एकलपीठाकडे मागितली. त्यावर न्यायालयाने त्यांना याचिकेत १४ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करण्याची परवानगी दिली. तसेच संजय व प्रवीण राऊत यांना १० दिवसांत या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश देत याचिकेवरील पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी ठेवली.

🤙 8080365706