
शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे.या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं असून यामध्ये शिंदे गटातील काही आमदारांना आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदी संधी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 42 जणांचा समावेश करता येतो. त्यामुळे साधारणतः चार आमदारामागे एक मंत्रिपद या प्रमाणे शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपदे मिळू शकतात. तर उर्वरित मंत्रिपदे भाजपच्या वाट्याला येतील. शिंदे आणि भाजपकडून छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल. भाजपकडून प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधताना आगामी महापालिका आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदारांना मंत्री म्हणून संधी दिली जाईल. मात्र, हे करताना दोन्ही गटाकडून धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. अशावेळी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते असेही ही म्हटले जात आहे. तसेच दोन्ही कोट्यातील मंत्रिमंडळातील 2 ते 4 जागा रिक्त ठेवल्या जाऊ शकतात.शिंदे गटात कोणाच्या नावांची चर्चा आहे ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार याची उत्सुकता आहे. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे.
