
जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवण्याचे व त्वचेतील आद्रता टिकवून ठेवण्याचे उपाय.
थंडीमुळे त्वचा कोरडी पडणं व थंडीच्या कपड्यांमुळे खाज सुटणं अशा समस्यांनी त्रस्त असाल तर खाली दिलेले ५ घरगुती उपचार तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरतील.सर्वात आधी त्वचेतील वाढता कोरडेपणा रोखण्यासाठी प्रयत्न करा.
यासाठी हिवाळ्यात अंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करु नका. तर थंड व गरम पाणी एकत्र करुन पाण्याचं तापमान सामान्य ठेवा. जेव्हा त्वचा ओली असेल तेव्हा मॉईश्चराईजर लावा. आंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसून घ्या. त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर तीन ते पाच मिनिटांच्या आत मॉईश्चराईजर लावा. चेहरा दिवसातून वारंवार धुणं टाळा. शक्य असल्यास फक्त रात्री चेहरा धुवा. ज्यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाऊन त्वचा कोरडीही पडणार नाही. ओठांसाठी चांगल्या व घरगुती लिपबामचा वापर करा. त्या लिपबाममध्ये पेट्रोलिअम जेली आणि मिनरल ऑईल असलं पाहिजे. थंडीच्या काळात बाहेरील थंडाव्यापासून बचाव करण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्या.
