…म्हणूनचं आम्ही निवडणूक रिंगणात-उमेश निगडे व गीता जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सभासदांना बँकेतून चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर बँकेच्या प्रगतीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आम्हाला निवडणुक रिंगणात उतरण्यासाठी आग्रह धरला, त्यामुळे आम्ही या निवडणुकीत उतरलो आहे. एकंदर अर्बन बँकेबद्दलची आपली भूमिका बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे व गीता जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन 2022 या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसामान्य सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीच्या रेट्यामुळे आमचे पॅनल नैसर्गिक पर्याय म्हणून निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील आपल्या मोठ्या आर्थिक संस्थेचे उज्वल भवितव्य, उन्नती आणि आधुनिक अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीशी  बँकेच्या सर्वसामान्य सभासदाच्या कल्याणाचा आमचा पुढील पाच वर्षाकरिताचा जाहीरनामा आहे.

कोण जुना आणि कोण नवा यामध्ये बँकेच्या सर्वसामान्य सभासद आणि मतदारांना स्वारस्य असत नाही. बँकेचा सभासद हा बँकेचा मालक आहे, त्याला त्याच्या गरजेच्या वेळी त्वरित सेवा, निकडीच्या वेळी हेलपाटे न मारता त्वरित सुलभ अर्थसहाय्य देणारे सेवाव्रती संचालक मंडळ असेल तर सभासदांची आणि बँकेची प्रगती निश्चित होते.

आपले पॅनेल कसे झाले याबाबत या पत्रात गीता जाधव यांनी असे म्हटले आहे, आमच्या पॅनलचे युवा नेतृत्व उमेश बाबुराव निगडे यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये कसोटी पूर्ण करून बँकेस राज्य स्तरावरील आठ पुरस्कार मिळविले. सभासदांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करून आदर्श निर्माण केला नवीन कार्यप्रणाली सुरू त्यामध्ये जुन्या कारभारी मंडळींनी खोडा घालून पुन्हा बँकेच्या प्रगतीत अडथळा निर्माण केला आहे. म्हणूनच आम्ही राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेल उभे करून निवडणूक रिंगणात उतरलो.

ही नवीन कार्यप्रणाली म्हणजे काय ? यामध्ये बँकेच्या शिपायापासून सीईओपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असते. किती मुदतीमध्ये कोणत्या कर्मचाऱ्याने रिपोर्टिंग वरिष्ठांपर्यंत करणे आवश्यक आहे याची कालमर्यादा ठरविण्यात आलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. याचा परिणाम असा होतो कर्जदारास कोणाचेही लांगूलचालन करण्याची, तीष्ठत बसण्याची वेळ येत नाही. या कार्यप्रणाली स्वरूप कार्पोरेट सेक्टरचे आहे. त्यामुळे बँकेची कार्यक्षमता वाढते, सभासदांच्या सोयीचे निर्णय होतात. कर्मचाऱ्यांचा संचालकांपुढे बसून वेळ घालवण्याचा त्रास कमी होतो.

जागतिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर वेगवान अर्थ सुधारणा होत आहेत. त्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन आपण प्रगती साधली नाही तर या स्पर्धेच्या युगामध्ये टिकाव लागणे अशक्य आहे.  नवीन दृष्टिकोन असणारे संचालक मंडळ बँकेमध्ये असणे जरुरीचे आहे. बँकेचे संस्थापक भास्करराव जाधव यांच्या स्नुषा आणि ज्येष्ठ संचालिका गीता दीदी जाधव यांच्या पासून शेतकरी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी अशा संमिश्र ग्रामीण आणि शहरी परिसरात काम करणारे, विविध वयोगटातील जुन्या नवीन उमेदवारांचे  उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखालील आमचे सक्षम पॅनेल वैभवशाली अर्बन बँक निर्माण करण्याचे स्वप्न घेऊन आपणासमोर येत आहे.

आपल्या बँकेचा अ वर्ग असल्याचे भासविले जाते. याबाबतची वस्तुस्थिती मोठी रंजक आहे. रिझर्व बँकेने आपल्या बँकेला क वर्ग दिलेला आहे आणि बँकेने नेमलेल्या ऑडिटर यांनी अ वर्ग दिलेला आहे. याचा परिणाम सभासदांना देण्यात येणाऱ्या लाभांश (डिव्हिडंट) रकमेवर होतो. बँकेचा अ वर्ग होता, तर सभासदांना लाभांश का देण्यात आला नाही? ही सभासदांची केलेली फसवणूक आहे.

रिझर्व बँकेकडून अ वर्ग मिळवणे संचालक मंडळाचे कर्तुत्व होय. कोरोना महामारी कालावधीत इतर आर्थिक संस्था वेगाने वाढल्या. इतकेच नव्हे तर आपल्याच बँकेतील एका संचालकाची पतसंस्था 10 पटीने वाढली मात्र आपल्या अर्बन बँकेचे मानांकन का घसरले याचा सभासदांनी विचार करणे जरूर आहे. धंद्यातील अचानक येणाऱ्या अडचणीमुळे जे प्रामाणिक कर्जदार थकबाकीदार होतात त्यांच्याकरिता ओ टी एस. ( एक वेळाची पुर्नस्थापना- One Time Settlement) करून देण्याची रिझर्व बँकेची परवानगी असते. आपल्या बँकेमध्ये सुद्धा ही व्यवस्था आहे. त्यास वर्तमानपत्रातून प्रसिद्धी देऊन अशा कर्जदारांना संधी देणे आवश्यक होते. मात्र ही माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्धी करून देण्यात आली नाही आणि अशा सुमारे 400 कर्जदारांपैकी ठराविक 19 कर्जदारांनाच फक्त ओ टी एस चा फायदा का करून देण्यात आला ? याचे कोडे आहे. उमेश निगडे यांनी सुरू केलेल्या नवीन कार्यप्रणाली बंद केल्याचा हा परिणाम झालेला आहे. बँकेची अधोगती होणार असेल तर जुने जुने म्हणून किती सोसावे याचा निश्चितपणे विचार झाला पाहिजे.

बँकिंग क्षेत्रामधील नवनवीन संकल्पनांचा आपल्या बँकेस फायदा करून घेण्यासाठी अनुभवी ज्येष्ठ तज्ञांचे मार्गदर्शन उमेश निगडे यांनी घेण्याकरिता सीईओ सारख्या पदांवर नेमणुका केल्या. सध्या बँकेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 55 वर्ष आहे. वास्तविक या वयापर्यंत कर्मचाऱ्यांना बँकेचा अनुभव येऊन ते परिपक्व झालेले असतात त्यांची वयोमर्यादा 58 नव्हे तर साठ वर्षापर्यंत वाढवणे संयुक्तिक होणार आहे त्यामुळे नवीन अनावश्यक भरती ऐवजी जाणत्या कर्मचाऱ्यांचा बँकेस फायदा होणार आहे. इतकी वर्षे बँकेमध्ये प्रामाणिक सेवा केल्यानंतर त्यांची निष्ठा आणि बँकेकरिता आपुलकी निर्माण झालेली असते.उमेश निगडे यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये घेण्यात आलेला मार्गदर्शक निर्णय म्हणजे बँकेची वाया जाणारा आर्थिक स्त्रोत थांबविणे.

मिरजकर तिकटी येथील येथे बँकेची स्वतःची जागा असून सुद्धा देवल क्लब च्या नवीन इमारतीमध्ये दरमहा भाड्याने बँकेसाठी जागा घेण्यात आली होती यावर वार्षिक तब्बल अंदाजे ४० लाख रुपये खर्च होत होता एकुण ६ वर्षाचे २कोटी ४० लाख अंदाजे खर्ची पडलेले तर विना वापर पडून असलेल्या मिरजकर तितकी येथील जागेमध्ये  निगडे यांनी बँकेची देवल क्लब मधील शाखा स्थलांतरित करून ज्येष्ठ वयोवृद्ध सभासदांच्या सोयीकरिता त्याच इमारतीतील खालच्या गाळ्यात एटीएम आणि बँकेचा काउंटर सुरू केला. काही कारभाऱ्यांची त्यामुळे नाराजी गोडाऊन ओढवली असली तरीही बँकेचे वार्षिक रुपये अंदाजे ४० लाख वाचले. सभासदांची सोय झाली आहे. असे लोकाभिमुख आणि बँकेच्या हिताचे निर्णय घेण्याची ग्वाही संस्थापक पॅनेलचे उमेदवार देत आहेत.

निवडणुकीत बँकेचा आत्मा असलेला सभासद म्हणजेच मतदार हा न्यायाधीश आहे. मतदार जाणता आहे. हेतू ठेवून सत्ता राबवणारा कारभारी आणि निरलस निस्वार्थ बुद्धीने बँकेची भरभराट करून देणारा सेवावृत्तीचा संचालक वर्ग यामधील फरक मतदारास नक्कीच माहिती आहे. त्या मतदारांच्या आणि सभासदांच्या विश्वासावर आम्ही राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेल विजयाची अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

🤙 8080365706