नांदेड : आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत.विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत हल्लाबोल केला.

विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही ; राहुल गांधी यांचा हल्लाबोल नांदेड : आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत.विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत हल्लाबोल केला. भारत जोडो यात्रा गुरुवारी नांदेड शहरात दाखल झाली. नवीन मोंढा मैदानावर राज्यातील पहिलीच जाहीर सभा घेण्यात आली. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीनंतर चुकीची जीएसटी लावण्यात आली. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतमालावर जीएसटी भरावी लागत आहे. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत. मालाला एमएसपी मिळत नाही, छोटे व्यापारी हैराण आहेत, तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आम्ही पायी चालत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.भारत जोडो यात्रा गुरुवारी नांदेड शहरात दाखल झाली. नवीन मोंढा मैदानावर राज्यातील पहिलीच जाहीर सभा घेण्यात आली. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी राहुल गांधी म्हणाले, नोटबंदीनंतर चुकीची जीएसटी लावण्यात आली. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच शेतमालावर जीएसटी भरावी लागत आहे. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत. मालाला एमएसपी मिळत नाही, छोटे व्यापारी हैराण आहेत, तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी आम्ही पायी चालत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.