बीड: आधीच परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या तडाक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. अशातच बीड जिल्ह्यामध्ये तुरीचे पीक फुलोऱ्यात आलं असतानाच या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या बीड जिल्ह्यामध्ये तुरीचं पीक फुलोऱ्यात आलं आहे. या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर्षी तुरीचे पीक अगदी जोमात आलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पिकं ऐन फुलोऱ्यात आलेल्या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.