संस्थापक पॅनललाच विजयी करण्याचा करवीर ग्रामीण पूर्व भागाचा निर्धार

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर अर्बन बँक निवडणुकीत राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलच्या कपबशीला मतदान करण्याचा करवीर तालुका पूर्व ग्रामीण भागातील प्रचार मेळाव्यात शेकडो सभासदांनी निर्धार केला.यावेळी जि.प. चे .माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले अर्बन बँकेत ग्रामीण भागातील बहुतांश व्यवहार आहेत त्यामुळे संस्थापक पॅनेलने सर्व पक्षांच्या वतीने शिवाजीराव मोरे यांना उमेदवारी देऊन याग्रामीण भागाला प्रतिनिधित्व दिल्याने ,खऱ्याअर्थाने सर्वांना सोबत घेऊन सहकार टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.


महाडिक युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष अर्जुन इंगळे यांनीआधुनिक कार्यप्रणालीने स्वच्छ व पारदर्शी कारभार करणाऱ्या उमेश उमेश निगडेयांच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या कपबशी चिन्हालाच मतदान करण्याचे सर्वपक्षीय सभासद कार्यकर्त्यांच्या वतीने आव्हान केले.
यावेळी पॅनेल प्रमुख उमेश निगडे श्रीमती गीता देवी जाधव यांनी सभासद हिताचा जाहीरनामा जाहीर करून तो राबविणार असल्याचे स्पष्ट केले.


या मेळाव्यासाठी टी.के.पाटील,एस .एम .पाटील ,. ( गोकुळ शिरगाव ) राजू माने काका पाटील उजळाईवाडी ),कृष्णात जोंधळेकर ( तामगाव ) नितीन संकपाळ ‘ ( नेर्ली ) युवराज पाटील ( कोगिल ) रवि मोरे (कणेरी ) आदीप्रमुखांसहकरवीर दक्षिण पूर्वपंचक्रोशीतील सर्वपक्षीय सभासद कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545