
गारगोटी : गारगोटी शहराला गार्ग्य ऋषींच्या वास्तव्यामूळे गारगोटी हे नांव दिले गेले. या नदिघाटाच्या कामाचा लोकार्पण सोहळा ही गारगोटी शहरातील अबालवृध्दांना उभारी देणार प्रसंग आहे. यापुढील कामात या नदिघाटाचा हा बांधकाम परिसर युगानुयुगे जनतेला आनंद आणि समाधान देत राहील यात शंका नाही. गारगोटी शहराच्या पर्यटनाला चांगल्या पध्दतीची चालना यामूळे मिळाली असून नदी घाटाच्या सुशोभिकरणामुळे गारगोटी शहाराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे गौरोद्गार काढले.
ते गारगोटी (ता.भुदरगड) येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्य नदी घाटाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. गारगोटीतील दत्त घाट परिसर त्रिपुरा पौर्णीमे निमित्य केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई व दिव्यानी उजळून निघाला होता. सुमारे अडीज कोटी रूपये खर्चून उभारलेलेल्या या घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी नदीमध्ये सजविलेल्या बोट मधून सफारीचा आनंद लुटला.आम्ही गारगोटीकर या ठिकाणी उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्याचा नागरीकांनी आनंद घेतला.

महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी नदीघाटाचे लोकार्पण आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, बाळासाहेब भोपळे, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, जि. प. सदस्या रोहिणी आबिटकर, अरूण शिंदे, सर्जेराव मोरे आदी उपस्थित होते.यावेळी माजी सभापती बाबा नांदेकर, बाळासाहेब भोपळे, अंकूशबापू चव्हाण, बाजीराव चव्हाण, जि.प.सदस्या रोहिणी आबिटकर, माजी सभापती स्नेहल परीट, सदाशिव खेगडे, गारगोटीचे माजी उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, सुशांत सुर्यवंशी, सदस्या अनिता गायकवाड, अल्ताफ बागवान, दिलीप देसाई, विजय सारंग, दिपक देसाई, राजेंद्र चिले, महेश सुतार, प्रविण भोई, सागर शिंदे, रुपाली राऊत, उपअभियंता श्री.मिरजकर, राहूल पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.