गोडसाखरचा दणदणीत विजय; आमदार राजेश पाटलांकडून आमदार हसन मुश्रीफांचे अभिनंदन

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील छत्रपती शाहू सभागृहात आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे आमदार राजेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कोल्हापूर :कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच मोठ्या चुरशीने झाली. या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील श्री. छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सर्व म्हणजे १९ जागा जिंकत मोठा विजय मिळविला.या विजयाबद्दल पराभूत आघाडीचे नेतृत्व केलेल्या आमदार राजेश पाटील यांनी कोल्हापुरात आमदार हसन मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात असलेल्या छत्रपती शाहू सभागृहात हा उपस्थितांनी हा क्षण अनुभवला. दौलत साखर कारखाना सुरू करण्याच्या संदर्भाने आयोजित केलेल्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. “गोडसाखरच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. या प्रचारात आमदार मुश्रीफ यांनी विरोधी या आघाडीचे प्रमुख आमदार राजेश पाटील यांच्यासह माजी आमदार श्रीपतराव शिंदे तसेच उमेदवार अशा कोणावरही आरोप किंवा टीका केली नव्हती. कारखाना ऊर्जेतावस्थेत आणून तो चांगल्या पद्धतीने चालविणार कसा, यावरच त्यांचे भाषण असायचे. आमदार पाटील यांनी मात्र थेट मुश्रीफानाच टार्गेट केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांनीही मोठ्या मनाने आमदार पाटील यांचा सत्कार स्वीकारला.

🤙 9921334545