शाहू भास्करराव जाधव पॅनेलला प्रचारात चांगला प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरात पॅनेलने काढलेल्या प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, परिसरातील युवक सभासदांच्या वतीने काढण्यात आलेल्या संवाद प्रचार दौऱ्यात मतदार सभासदांच्या घरोघरी भेट देऊन बँकेला उर्जित अवस्था आणण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. गेली दोन वर्षे बँकेच्या सभासदांना डिव्हिडंड मिळाला नाही अशी खंत मेजर विलासराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, बँकेला ऊर्जित अवस्था प्राप्त करण्यासाठी संस्थापक पॅनलच्या उमेदवारांना मतदान करा, निश्चितपणे आम्ही सभासदांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही उमेदवारांनी दिली.

 या प्रचार रॅलीत भैया खेडेकर, सुनील बोडके, राजू सरनाईक, प्रकाश निंबाळकर, काशीम मुल्ला, विनायक मोरे, मुन्ना बागवान, अमर तपकिरे, प्रदीप पाटील आदींसह  नागरिक, सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

🤙 9921334545