गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत शाहू समविचारी आघाडीची एकहाती सत्ता

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आ.हसन मुश्रीफ आणि डॉ.प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सर्वच्या सर्व १९ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. दरम्यान या निवडणुकीत त्यांनी विरोधी काळभैरव शेतकरी, कामगार विकास आघाडीचा दारुण पराभव केला.

या निवडणुकीत विरोधी बाकावर राहिलेल्या डॉ. शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांना सोबत घेत यावेळी मुश्रीफ यांनी समविचारी नेत्यांची मोट बांधली,तर याविरोधात आ. राजेश पाटील तसेच माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी काळभैरव आघाडीचे नेतृत्व केले. अ‍ॅड.शिंदे यांनी प्रथमच निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे त्यांच्याशिवाय ही आघाडी रोखण्याचे आव्हान मुश्रीफ कसे पेलणार, याची सभासदांमध्ये उत्कंठा होती.

🤙 9921334545