कागल (प्रतिनिधी) : सुळकूड (ता.कागल) येथे प्रस्तावित इचलकरंजी पाणी योजनेच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आले होते. यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध करण्यात आला.
त्याचबरोबर दत्तवाड (दि.९),कंसबा सांगाव (दि.१०), मौजे सांगाव व रणदिवेवाडी येथे (दि.१२) नोव्हेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान (दि.१४ नोव्हेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे असे दुधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.
या बंदवेळी अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान नागरिकांनी ग्रामपंचायत चौकात टायर पेटवून निषेध व्यक्त केला. तसेच ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापचं’,’देणार नाही देणार नाही पाणी आम्ही देणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. येणाऱ्या दहा ते अकरा दिवसांत हि योजना रद्द केली नाही तर दुधगंगा काठचे नागरिक एकत्र येत, मोठ-मोठ्या कारखाने औद्योगिक वसाहतीसाठी पाणी पुरवठा करणारे जॅकवेल बंद पाडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. तालुक्यातील राजकीय नेत्यांनी याबद्दल आपली भुमिका लवकरात लवकर मांडावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या मोर्चात कागल, हातकणंगले,शिरोळ,करवीर या तालुक्यासह कर्नाटक येथील गजबरवाडी,शिवापूरवाडी, कोगनोळी, हंचिनाळ,कुन्नूर,कारदगा,भोज,बारवाड येथील नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी सुळकूड ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया भोसले,उपसरपंच शरद धुळूगडे, डॉ.अरुण मुदाण्णा,विरगोडा टेळे,युवराज पाटील,चंद्रकांत पाटील,अमोल शिवई,दिनकर लगारे,भाऊसो मुदाण्णा, पोपट भंगे पाटील,टि.एम.खोत, दादासो चवई, कलगोडा टेळे,बापूसो देशपांडे,क्रांतीकुमार पाटील,अनिल महादेव,रोहित पाटील, डॉ.भिमगोडा सरदार,आण्णासो कुंभार,ए.डी.चौगुले,सिध्दगोडा बाळाण्णा,आण्णासो खोत, सचिन शिंगे,विजय कऱ्याप्प,गणेश कोणे,सचिन परीट,काकासो वाणी,बाळासो माने,शिवाजी चवई, राजू लगारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.