समरजित घाटगे यांनी घेतली मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट

कागल (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भेट घेऊन आभार मानले.

शिंदे-फडवणीस सरकार सत्तेवर येताच राज्यातील प्रामाणिकपणे कर्ज परत फेड करणाऱ्या शेतकर्‍यांना रुपये ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला. दिवाळी पूर्वी ही रक्कम  शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून राज्यातील प्रामाणिक  शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली.याबद्धल मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी समरजित घाटगे वारंवार पाठपुरावा करत होते. शिवार संवादच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. प्रसंगी कोल्हापूर येथे दसरा चौकात उपोषणाला बसले. पण त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. घोषणाबाज आघाडी सरकारने मागील अडीच वर्ष केवळ घोषणा करण्यामध्येच वेळ घालवला.परंतु,शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच तात्काळ प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्यय घेऊन शेतकर्‍यांना अनोखी दिवाळी भेट दिली.

🤙 8080365706