गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेत दिली. तसेच या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.

गुजरातमध्ये गेली २५ वर्ष भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे गुजरातच्या यंदाच्या  निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘होम ग्राऊंड’वर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम-पहिला टप्पा

नोटिफिकेशन – ५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर

अर्जांची छाननी – १५ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – १७ नोव्हेंबर

मतदान – १ डिसेंबर

गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम-दुसरा टप्पा

नोटिफिकेशन – १० नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज अंतिम तारीख – १७ नोव्हेंबर

अर्जांची छाननी – १८ नोव्हेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर

मतदान – ५ डिसेंबर

दोन्ही टप्प्यांची मतमोजणी आणि निकाल – ८ डिसेंबर

🤙 9921334545