कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (बुधवारी) लव्ह-जिहाद विरोधात हिंदू जन-आक्रोश आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपचे आमदार नितेश राणे सहभागी झाले होते.

कोल्हापुरात नुकत्याच घडलेल्या लव्ह जिहाद व १३ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाच्या निषेधार्थ जुना राजवाडा पोलीस स्टेशन समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोरचं ठिय्या मांडत पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी हातात मागणीचे फलक घेत, जोरदार घोषणाबाजी करीत या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.