राजर्षी शाहू भास्करराव जाधव पॅनलचा प्रचार शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज (मंगळवारी) करण्यात आला.

या प्रचार शुभारंभावेळी मनोगत भाषणात बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले की, ग्रामीण भागाला प्रतीनिधीत्व करण्याची संधी उमेश निगडे यांच्यामुळे प्राप्त झाली. तब्बल १०९ वर्षांनी ग्रामीण भागाला प्रतीनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे गावातील सभासदांनी बॅंकेच्या हितासाठी कोल्हापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षि शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलच्या कपबशी या चिन्हावर मतदान करून पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.  

उपसरपंच अजित शशिकांत मोरे यांनी गावातील सभासदांना कपबशी या चिन्हावर मतदान करून पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन बॅंकेच्या प्रगतीस हातबार लावून सभासदांचे हित जपण्याचे आवाहन केले. दरम्यान, गावातील सभासदांनी राजर्षि शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनलला पाठींबा दर्शविला.

यावेळी रवींद्र बळवंत मोरे, प्रकाश दादू खोत, विनोद शामराव खोत, दादू बापू खोत, संजय शंकर कदम, श्रीपती सखाराम खोत, शामराव गणेशाचार्य, राऊसो भाऊसो निंबाळकर, जयपाल धुळाप्पा शेळके आदींसह गावातील सर्व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना अरुण महादेवराव मोरे यांनी केली.

🤙 9921334545