कोल्हापूर (प्रतिनिधी) : विज्ञान व प्राद्योगिकी विभाग,भारत सरकारच्या निधी आय.टी.बी.आय. या उपक्रमाअंतर्गत २०२१-२२ साठी महाराष्ट्रातून कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची निवड करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत संस्थेला ५ कोटी निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती केआयटीचे प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर डॉ.एस.एम.पिसे यांनी दिली. कोल्हापूर प्रेस क्लब येथे आज (शनिवारी) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या उपक्रमांतर्गत संस्थेला ५०० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. मे-जुन २०२१ मधील जाहीरातीनुसार देशभरातील ६०० संस्थांनी आवेदन प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला होता. ज्यामध्ये आयआयटी, एन्आयटी, अभिमत विद्यापीठ, संशोधन संस्थांचा समावेश होता. नॅशनल इव्हॅल्यूएशन कमिटी मार्फत सर्व आवेदक संस्थांचे अहवाल सुक्ष्मरित्या अभ्यासून ८७ संस्थांचे अहवाल अंतिम सादरीकरणासाठी निवडण्यात आले. जानेवारी २०२२ मध्ये देशभरातून ३० संस्थांची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली. यामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून केआयटी या स्वायत्त संस्थेची निवड करण्यात आली. केआयटी मध्ये सुरु असलेले प्राध्यांपकांचे संशोधन आणि इन्स्टिटयुट इनोव्हेशन कौन्सिलतर्फे चालणारे स्टार्टअपस् अंतर्गत कार्यक्रम तसेच नॅक, एन्.बी.ए. मानांकने, इंडस्ट्री-इन्स्टिटयुट संपर्क उपक्रम या प्रभावी मुद्दयामुळे संस्थेची निवड झाली असल्याचे डॉ.पिसे यांनी यावेळी सांगितले.
नॅशनल इनिशिएटीव ऑफ डेव्हलपमेंट इन हार्नेसिंग इनोव्हेशन (निधी) इन्क्लुसिव्ह टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर (आय.टी.बी.आय) या योजनेचे महत्वाचे उद्दीष्ट हे राष्ट्रीय स्तरावर इनोव्हेशन अॅंड स्टार्टअप ला प्रोत्साहीत करणे हे असून यासाठी इनक्युबेशन सेंटर चालू करणे, स्टार्टअप आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोत्साहीत करणे यासाठी क्षेत्रीय कार्यक्रम राबवणे व नियोजित निधीमधून इकोसिस्टीम तयार करणे या पध्द्तीचा वापर केला जाणार आहे. केआयटी कॅम्पस मध्ये या उपक्रमासाठी १ हजार स्के.फुट जागा नियोजित केली असून कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे इनोव्हेशन व रिसर्च फॉऊंडेशन या सेक्शन ८ कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व इनोव्हेशनसाठी यंत्रसामग्री व स्टार्टअपसाठी क्युबीकल्स्) ची रचना या जागेमध्ये करण्यात येईल. या उपक्रमासाठी संकेतस्थळ निर्मीती, मनुष्यबळाची नेमणुक, यंत्रसामग्रीची निवड या बाबीचीं पूर्तता भारत सरकारच्या नियमाप्रमाणे सुरु असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी यांनी दिली.
या उपक्रमातून मिळालेल्या निधीमध्ये १५० लाखांचा निधी नवीन स्टार्टअपसाठी इग्निीशन गॅं्रंट म्हणुन वापरला जाईल व असा भारत सरकारचा निधी उपलब्ध असलेले केआयटी हे महाराष्ट्रातील एकमेव सेंटर असेल अशी माहिती उपक्रमाचे को-प्रिन्सीपल इन्हेस्टीगेटर डॉ.रोहन नलवडे यांनी दिली.
या उपक्रमामध्ये आपला अहवाल सादर करण्यासाठी संस्थेतील संशोधक प्राध्यापक, इन्स्टिटयुट इनोव्हेशन कौन्सील आंत्रोप्रन्योर डेव्हलपमेंट सेल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्य यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच केआयटीच्या पाठींब्यातून तयार झालेले पाच ते सहा स्टार्टअप उल्लेखणीय राहीली अशी माहिती उपक्रमाचे को-प्रिन्सीपल इन्हेस्टीगेटर डॉ.सचिन शिंदे यांनी दिली.
या उपक्रमामध्ये इनोव्हेटर्स व स्टार्टअप्स्नी सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. लवकरच संकेत स्थळाबाबतची माहिती प्रसिध्द् करण्यात येणार आहे. या उपक्रमास संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी व कार्यकारी संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जिन्नी यांचे तर अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली व सचिव दिपक चौगुले यांचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले आहे.या पत्रकार परिषदेस केआयटीचे पदाधिकारी उपस्थित होते.