कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावली सणाचे औचित्य ईश्वर फाउंडेशन व जंगम कृषी उद्योग यांच्या वतीने समाजातील गरजू लोकांना फराळ,पणत्या,रांगोळी,आकाश कंदील तसेच कापडी पिशव्या आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. रांगोळी व पणत्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यामधून या साहित्यांचे वाटप केले.

या उपक्रमास नितीन जंगम,विकास कदम,अनिल पाटील,सुभाष स्वामी,शशिकांत घाडगे, सौ.उज्वला कारंडे, राहुल कोल्हापूरकर, संतोष पाटील, संतोष मुंडे, रमेश खाडे, अभिजीत पाटील, सचिन तोरस्कर, विजय कुंभार,अजित जाधव,योगेश चौगले आदींचे सहकार्य लाभले. या सर्वांचे ईश्वर फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले.