कागल येथील श्री. बिरदेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न !

कागल (प्रतिनिधी) : येथील धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.बिरदेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा विधिवत व धार्मिक वातावरणात पार पडला. या जिर्णोद्धार सोहळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना समरजीत घाटगे म्हणाले की, मंदिराच्या बांधकामास बरेच दिवस झाले असून त्याची विशेष दुरुस्ती करणे अत्यावश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन येथील प्रमुख धनगर समाज बांधवांनी या जिर्णोद्धाराची जबाबदारी घेऊन लोकवर्गणी व देणगी स्वरूपात रक्कम जमा करून हे काम पूर्णत्वास नेले आहे. आज या मंदिराचे उद्घाटन करण्याचे भाग्य तर मला लाभलेच विशेष म्हणजे या ठिकाणी बाळूमामांच्या बकऱ्यांचे आगमन झाले असल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. या बकऱ्यांच्या रूपात साक्षात या ठिकाणी बाळूमामांचेच दर्शन झाले असे मला वाटते. या मंगलमय सोहळ्यात गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते.

या जीर्णोद्धाराच्या कामासाठी बाळू पाचगावे, आकाराम शेळके ,म्हाळू पाचगावे , हरी बोते  यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत उत्तम पाचगाव यांनी तर प्रास्ताविक महादेव करेकट्टी यांनी केले तर आभार नंदू माळकर यांनी मानले. या कार्यक्रमास तुकाराम शेळके, प्रकाश पाटील, दीपक मगर, शिवाजी माळकर, सतीश पाटील, संजय माळकर, शरद शेळके यांच्यासह धनगर समाजातील समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545