प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची व चॅनलची पाहणी केली.

कसबा बावडा येथील रमणमळा, त्रिंबोली नगर, पिंजार गल्ली, संकपाळ नगर, सदरबाजार, विचारेमाळ व सिध्दाळा गार्डन येथील सार्वजनिक शौचालयची पाहणी केली. या ठिकाणी नागरीकांमार्फत या शौचालयाचा वापर होतो का याबाबत नागरीकांच्या घरी भेटी देऊन माहिती घेतली. त्रंबोलीनगर येथील हॉलजवळील चॅनेलची पाहणी करुन चॅनल स्वच्छता व दुरुस्ती करण्याच्या सूचना उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे व मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांना दिल्या.

यानंतर चंद्रेश्वर प्रभागातील रंकाळा रोड येथे चॅनेलची पाहणी करुन चॅनेलची दैनंदिन स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, मिरा नगीमे, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, आरोग्य निरिक्षक नंदकुमार पाटील, करण लाटवडे, ऋषीकेश सरनाईक उपस्थित होते.

🤙 9921334545