दूध उत्पादक शेतकरी हाच गोकुळचा आत्मा-आ.हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळचा दूध उत्पादक शेतकरी हाच आत्मा आहे. त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्यक्रम हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत सहा वेळा दूध खरेदी दरामध्ये वाढ केली. म्हैस दुधाला प्रति लिटर ८ रुपये तर गाय दुधाला ९ रुपये इतकी ऐतिहासिक वाढ दिली. निवडणुकीच्या कालावधीत आम्ही शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, त्याची पूर्तता करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. दुधाला चांगला भाव मिळू लागल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढला  अशा भावना आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या.गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारसनिमित्त आज (शुक्रवारी) गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात गाय-वासरांचे पूजन करण्यात.यावेळी ते बोलत होते.

संघाचे चेअरमन विश्वास पाटील तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित गाय-वासरांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गाय दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिला दूध उत्पादकांच्या हस्ते गाय वासराचे पूजन झाले.

आपल्या संस्कृतीची जपणूक तसेच उत्तम पशुसंवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने गोकुळमार्फत वसुबारस कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशा शब्दांत मुश्रीफ यांनी दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. वातावरणातील बदल, जागतिक तापमान, दुधाची वाढती मागणी आणि वैरणी कमतरता या साऱ्या घटकांचा दूध वाढीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणत आमदार मुश्रीफ यांनी या स्थितीत गोकुळ दूध संघाने कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. यंदा म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२ कोटी ८३ लाख रुपये इतकी उच्चांकी अशी रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली. आम्ही, २० लाख लिटर दूध संकलानाचा संकल्प केला आहे. संचालक मंडळाला विभागवार जबाबदारी दिली असून कर्नाटक व सीमा भागातील सरासरी दीड लाख लिटर दूध उपलब्ध असून संघाच्या संचालकांनी व अधिकाऱ्यांनी दूध संघाकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. तसेच दीपावलीच्या दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, व संघाचे अधिकारी- कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की,भारतीय संस्कृतीचीही जपणूक व्हावी व यातून दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी गोकुळ नेहमी प्रयत्नशील असतो. भारतीय कृषीसंस्कृती व दुग्धव्यवसायाची सांगड घालण्याचा प्रयत्न आहे. दूध उत्पादन वाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संपूर्ण जिल्हात वसुबारस दिवशी दुधाळ जनावरांची पुजा करण्याचे आवाहन परिपत्रकाद्वारे गोकुळ मार्फत केले आहे. त्यास अनुसरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक दूध संस्थांचे मार्फत गाय-वासरू पूजनाचा कार्यक्रम हाती घेऊन हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले,अजित नरके, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड,रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील(बापू), विजयसिंह मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.यु.व्ही.मोगले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🤙 9921334545