जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्तांचा सत्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुला-मुलींचा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कोअर बँकींग प्रणाली तसेच मोबाईल ॲपचे उदघाटन करण्यात आले.

संस्थेच्या शाहुपूरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे होत्या. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष राजीव परीट होते.

प्रियदर्शिनी मोरे म्हणाल्या, २१ व्या शतकातील पिढी अत्यंत सक्षम असून त्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली प्रयत्न केल्यास यश नक्कीच आहे. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते १९१ विद्यार्थी व २९ सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. कोअर बँकिंग प्रणाली व मोबाईल ॲप सुविधेचे उदघाटन करणेत आले. संस्थेच्या सभासद कर्जावरील व्याजदर दि.१ जून पासून ९.५ टक्के करणेत आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात एस. एम. एस. बँकींग सुविधा देणारी तसेच सभासदांना सुविधा व मोबाईल ॲप सुविधा देणारी पहिली पगारदार पतसंस्था म्हणून संस्थेने नावलौकीक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर सभासदांना दर सहामाही खातेउतारा घरपोच केला जातो. एस. एम. एस. बँकींगव्दारे सभासदांना खात्याची तात्काळ माहिती उपलब्ध होते.

प्रास्ताविक चेअरमन राजीव परिट तर स्वागत व्हा. चेअरमन दिनकर तराळ यांनी केले. यावेळी मॅनेजर व्ही. एन. बोरगे, संचालक महावीर सोळांकुरे, विजय टिपुगडे, शिवाजी काळे, रामदास पाटील, शांताराम माने सचिन मगर, श्रीकांत वरुटे, बजरंग कांबळे, विष्णू तळेकर, रविंद्र घरते, रंजना आडके, संगीता गुजर, एन. डी. पाटील, रणजीत पाटील, सुनिल मिसाळ, नासिर नाईक. तज्ञ संचालक सयाजी पाटील, विजय गवंडी उपस्थित होते.