गांधीजींच्या विचाराची देशाला गरज : शामराव देसाई

गारगोटी (प्रतिनिधी) : भारत देशाला महात्मा गांधीजींचा कधीही विसर पडणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराची आज देशाला गरज असल्याचे प्रतिपादन भुदरगड तालुका राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी केले.

गारगोटीच़्या कॉग्रेस कमिटी कार्यालयात ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य जीवम पाटील हे होते.


राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या देशव्यापी चळवळीने व असहकाराने हे स्वातंत्र्य लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे माजी जि प सदस्य जीवन पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.


यावेळी बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, प्रकाश देसाई (आण्णा), एस. एम. पाटील, पी. जी. मगदूम, माजी सरपंच राजू काझी, मोहन शिंदे,बाळासाहेब गुरव, धनाजी कुरळे, वसंतराव मुळीक, रंगराव देसाई,प्रा सुभाष देसाई, शिवाजीराव देसाई आदी उपस्थीत होते.

🤙 9921334545