कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी, म्हणजेच शनिवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मदुराई निवासिनी भुक्ती मुक्ती प्रदायिनी रूपात पूजा साकारली आहे.
करवीर निवासिनी सिंहासनावर विराजमान होऊन भक्तांना दर्शन देत आहे अशा स्वरूपाची पूजा आहे. अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी व गजानन मुनीश्वर यांनी पूजा बांधली.