कारखानदारांच्या छाताडावर बसून दोनशे रुपये घेणार; राजू शेट्टी

म्हाकवे : चार वर्षात वाढत्या महागाईनुसार ऊसदरात वाढ झालेली नाही. गतवर्षीचे २०० रुपये साखर कारखानदारांच्या छाताडावर बसून घेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

आणूर (ता. कागल) येथे जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा या अंतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, उसाचे अर्धा-पाव टन वजन वाढावे यासाठी कुटुंबियांना उन्हातान्हात कांड्या गोळा करायला लागतात. मात्र, साखर कारखानदार सहजपणे एका वाहनामागे दीड ते अडीच टनाची काटामारी करुन कोट्यावधीचा दरोडा घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी
या साखर चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकजूट करावी.