ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

पुणे प्रतिनिधी : पुण्याच्या राजगुरूनगर येथे काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या बाळाचा दुचाकी आणि ट्रॅक्टरच्या अपघातात मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडल्यानंतर उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

अधिक माहिती अशी, आपल्या सहा महिन्याच्या आजारी बाळाला आई, वडील दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जात होते. पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरला पुढे जाण्यास त्यांनी जागा दिली, मात्र ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने सहा महिन्याचं चिमुकल बाळ आईच्या हातातून थेट ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेले. क्षणार्धात त्याचा आईच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बाळाला उचलून त्या आईने काळजाला घट्ट धरले अन हंबरडा फोडला. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक थांबला नाही तो तसाच पुढे निघून गेला.

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी बाळ पाहताच हळहळ व्यक्त केली आणि दुचाकी बाजूला घेऊन त्या बाळाच्या आई, वडिलांना धीर दिला. संबंधित ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

🤙 9921334545