पेठवडगाव प्रतिनिधी : दानोळी येथील मधला कुंभोजवरील लंबे मळ्यात देशी गाईवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला. यात या गाईचा मृत्यू झाला. ही गाय तीन वर्षाची होती.

दानोळी-कुंभोज मधला रोड लगत लंबे मळ्यात सुधीर उर्फ बंडू लंबे यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्या लगत असलेल्या शेडमध्ये देशी गाई व इतर जनावर बांधली होती. काल (सोमवारी) मध्यरात्री हिंस प्राण्यांनी गाईवर हल्ला चढवला. या हल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. सकाळी लंबे है रोडकडे गेले असता, गाईचा हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी याची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना दिली. पोलीस पाटील नेजकर रामचंद्र वाळकुंजे, उमेश केवले यांनी पाहणी करून वनविभागाला पाचारण केले आहे. यात लंबे यांचे अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.