कसबा बावडा प्रतिनिधी : येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत महाद्वार रोड येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नागरिकांना साउंड सिस्टीमचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कापसाच्या बोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २ वर्षानंतर कोल्हापुरात भव्य अशी गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी निघाली. यामध्ये बऱ्याचश्या मंडळांनी मिरवणुकीसाठी साउंड सिस्टीमचा वापर केला होता. साउंड सिस्टीमचा आवाजाच्या तिव्रतेमुळे लोकांच्या कानाला त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान कापसाच्या बोळ्यांचे वाटप करत लोकांचे प्रबोधन केले. गेली ११ वर्षे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना डी.वाय.पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज डी.पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे व रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता व जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. प्रमोद चौगुले, प्रा. संकेत शिंदे, तुषार आळवेकर यांच्या समवेत रत्नदीप कांबळे, ओंकार कोतमीरे, सुमित कांबळे, कल्याणी भामटेकर, प्रज्ञा महाडिक, मनीषा कांबळे, सुयोग जगदाळे, अमृत नरके, प्रथमेश आरगे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.