मुंबई वृत्तसंस्था : यंदाचा गणेशोत्सव कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं.
गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. आज शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.पारंपारिक वाद्य,साऊंड सिस्टीम,लेजर शो आदींसह भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.