शिराळा प्रतिनिधी : प्रा.डॉ.वैशाली गुंजेकर यांचा आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेऊन, स्वतःचे करिअर घडवावे. प्रयत्न, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर शिक्षणामध्ये विविध संधी शोधाव्यात आणि त्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख राजकुमार पाटील यांनी केले. वैशाली श्रीकांत गुंजेकर यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल बांबवडे (ता.शिराळा) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शंकरराव मोरे होते.

डॉ. वैशाली गुंजेकर यांनी शिवाजी विद्यापीठातून डॉ.प्रकाश दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विषयातून १९६० नंतरच्या निवडक प्रवास वर्णनांचा अभ्यास संदर्भात संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली.
यावेळी बोलताना वैशाली गुंजेकर म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यांने विविध क्षेत्रात यश मिळवताना जिद्द, चिकाटी, व सयंम ठेऊन ध्येय निश्चित केले पाहिजे. यश १००% मिळू शकते. माझे यश हे पती, आई, वडील, व गुरु यांची प्रेरणा घेऊन मिळाले आहे.प्रत्येकाने असेच यश मिळवावे .
यावेळी शिक्षक संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, दिलीप हिंगणे, संदिप गुरव, आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दिपक गुरव, शांतिनाथ सुतार, विश्वास पाटील -कंदुरकर,हिंमतराव घोडके, मालती घोडके,रूपाली पुजारी, हर्षद गुंजेकर, सोहम घोडके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकांत गुंजेकर,सूत्रसंचालन निवास पुजारी तर आभार रविंद्र पुजारी यांनी मानले.