तामगाव येथील अतिक्रमणे नियमित करा-सतिश माळगे

कोल्हापूर प्रतिनीधी : तामगाव ता.करवीर येथील गावच्या हद्दीतील गट नंबर १००७ मधील अतिक्रमणे नियमित करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) च्या वतीने करण्यात आली. जिल्ह्याचे नेते सतिश माळगे यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हा निवासी जिल्हाधिकारी प्रभारी कवितके यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हंटले आहे की, तामगाव येथील जी गायरान मिळत आहे, त्या मिळकतीमध्ये बऱ्याच जाती धर्माच्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. तेथील काही समाजाचे अतिक्रमण ग्रामपंचायत कार्यालयाकडून कायम करण्यात आलेले आहे. अनुसूचित जातीमधील लोकांचे सदर ठिकाणी सन २०११ च्या पूर्वीपासून अतिक्रमण आहे. तसेच सदर ठिकाणी अनुसूचित जातीमधील नागरिकांची पक्की घरे देखील आहेत. त्या ठिकाणचे आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच त्या घरामध्ये वीज कनेक्शन आहे.

सदरचे अतिक्रमण २०११ पूर्वीचे आहे. त्याबाबत विचार करता २०१७ साली शासन निर्णयाने सदरचे अतिक्रमण कायम करणे गरजेचे आहे. तसेच या जागे व्यतिरिक्त संबंधित अतिक्रमणधारकांना कोठेही इतरत्र जागा उपलब्ध नाही. तसेच त्या ठिकाणी सदर जागेमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास आहेत. त्यांचे अतिक्रमण झाल्यास त्यांना कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय मिळणार आहे असेही या निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी नेर्लीचे ग्रा.पं.सदस्या प्रदीप ढाले, अमर दाभाडे, रणजीत कांबळे, नितीन कांबळे, भारती कांबळे, वृंदा तोरस्कर, संतोष कांबळे, बाळाबाई सासणे, लोचना कांबळे, कल्पना कांबळे, रमेश कांबळे, रोहन कांबळे, माणिक कांबळे, आशिष वर्धन, अंजना धोत्रे, राजू धोत्रे, अश्विनी कांबळे, सरोजिनी कांबळे, रघुनाथ कांबळे, पौर्णिमा वंटे, अमोल वंटे, भगवान कांबळे यांच्यासह महिला कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.