कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर दौर्यावर आलेल्या नामदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाडिक कुटूंबियांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. खासदार धनंजय महाडिक यांनी नामदार सिंधिया यांचा शाल-श्रीफळ आणि श्री अंबाबाईची प्रतिमा देवून सत्कार केला. त्याचबरोबर उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचाही महाडिक कुटूंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दरम्यान,गडमुडशिंगी इथल्या शेतकर्यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी दिलेल्या जमिनीच्या बदली पर्यायी जमीन द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन माजी आमदार अमल महाडिक यांनी दिले. यावर तातडीने निर्णय घेण्याची ग्वाही नामदार सिंधिया यांनी दिली. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, सत्यजीत कदम, संग्राम निकम, अरूंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, राहूल महाडिक, ओमवीर महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.