कोल्हापूर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे आशीर्वाद घेऊन त्यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आहे. माझे सौभाग्य आहे की मला याठिकाणी दर्शन घेण्याची संधी आहे. ही माझी अस्तित्वाची माती आहे. या मातीशी माझे कोई एक संबंध आहेत. शिंदे महाराज यांची विचारधारा या मातीत येऊन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज केला असल्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी आज अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी वाडी रत्नागिरी येथे जाऊन दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील हे उपस्थित होते.