जोतिरादित्य सिंधिया यांनी घेतले अंबाबाई आणि श्री जोतिबाचे दर्शन

कोल्हापूर प्रतिनिधी : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी आज (शनिवारी) वाडी रत्नागिरी येथे जाऊन दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी वाडी रत्नागिरी येथे जाऊन दख्खनचा राजा श्री जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

दरम्यान, आज दुपारी कृषी महाविद्यालय वसतिगृहातील राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. दर्शनावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

🤙 9921334545